तू नेहमीच धडपडायचा
तिला आपलेसं करण्यासाठी
तुला मदत करता करता
नकळत मीहि धडपडायची
तुला आपलेसं करण्यासठी
व्हायचं तुमचं लुटुपुटीचं भांडण
अन् मग तुमचं ते रुसणं फूगणं
मीच बनायचे मग मध्यस्थ
अन् द्यायचे तुमचे हात एकमेकांच्या हातात
जायचो आपण डोंगरदऱ्यात फिरायला
भटक भटक भटकायचो
अन् मग तुम्हाला एकांतात सोडून
पापण्यातले अश्रू लपवत
खिळवायची मी नजर पुस्तकाच्या पानावर
तिचं ते माझ्या नावावर घराबाहेर पडणं
तुमचं ते फिरायला जाणं
माझं मग बागेतल्या कोपऱ्यात
शून्यात नजर लावून तुमची वाट पहाणं
कधीतरी वाटायचं
देत आहोत आपणच आपल्या प्रेमाची आहूती
पण दुसऱ्याच क्षणी उमगायचं
प्रेम् असतं फ़क़्त देण्यासाठी
धडपडूच नये ते आपलेसं करण्यासाठी .
-अनिल
No comments:
Post a Comment