Friday, March 7, 2008

प्रेत

दुःख जे दाटले उरी, थडगे त्यावरी बांधियले
आणित हासू ओठांवरी, माझेच प्रेत मी मिरवीले

उघडनारे मनात सारे, दरवाजे बंद केले
चिरडुन टाकीत भावनांना, ताजमहाल मी उभारले

लपवीत लक्तरे मनाची, तलम रेशीम पांघरले
थिजवून टाकीत ह्र्दय हळवे, नेत्रास बांध घातले

दाखवीत आमिष सुखाचे, मनास मी समजावले
भूतकाळास विसरन्याचे, चोरुन आश्वासन घेतले

क्रुरतेने घाबरून माझ्या, मन वेडे हे गारठले
भडभडनाऱ्या चितेवरती मग, त्यास शेकुन आणले.
-अनिल .
-

No comments: