Tuesday, March 25, 2008

आठवणींचे पुस्तक

कधी अचानक वा-राची झुळूक येते
मनाचा तळ ढवळून काढते
खोलवर कुठेतेरी दडलेल्या आठवणींना
अलगद वर आणून ठेवते .

आणि मग आठवणींत रमतं मन
पिंजलेल्या कापसाच्या पुंजक्या सारखे
तरंगु लागते हेलकावे खात
भुतकाळाच्या वा-रावर.

प्रत्येक आठवणीपाशी क्षणभर थांबत
कधी नकळत पापणी ओली करत
कधी ओठांवर हास्य फूलवत
आठवणींचे चित्र रंगवते डोळ्यांवर .


मग कधीतरी मन अलगद था-यावर येते
नजरे समोर पुस्तकाचे पान फडफडत असते
अन तरीही हे वेडे मन ..........
रेंगाळत असते आठवणींच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर .
-अनिल बिहाणी.

Friday, March 21, 2008

बरसावं तर .............

बरसावं तर श्रावणासारखं
अगदी हळूवार
बरसतानाही ढगाआडून
धरावी मायेची उबार

बरसता बरसता अचानक
कधी बसावे लपून
ढगाआडून डोकवावं बनून
सोनसळी उन.

मोग-याजवळ रहावं साचून
छानसं तळं बनून
झूळझुळ करीत जावे कधी
झ-यासंगे वाहून .

बरसावं तर अगदी असंच
जावी स्रूष्टी मोहरून
बरसण्यानेही आपुल्या जावे
सा-यांचे चित्त सुखावून .

कधीतरी जावे मग
नकळत निघून
गेल्यानंतरही ह्रदयात कुणाच्या
असावे हिरवळ बनून .
-अनिल बिहाणी.

Saturday, March 15, 2008

मी सुखीच राहिलो

मी होतो भिकारी अन् भीकारीच राहीलो
भरभरुन देउन सारे ,भरलेलाच राहीलो

जो तो मजला सांगित दुःखे ,भावनांशी खेळून गेला
मज ऐकण्या कुणी न उरले ,मी सुखीच राहिलो

कधि इथे अन् कधी तीथे,सारे मजला शोधीत होते
सापडुन मग साऱ्यानांही ,हरवलेलाच राहीलो

मी नव्हतो कुणाचा ,कूणीही माझे नव्हते कधी
आप्त स्वकीयांच्या घोळक्यात,मी परकाच राहीलो

झाडावरच्या पक्ष्यांनाही, त्यांनी दगड मारले
ते हात जाहले, अन् मी दगड जाहलो.
-अनिल .

Wednesday, March 12, 2008

माझं प्रेम आहे..........

अंगणातल्या झाडावर
झाडांच्या फूलांवर
फूलांच्या गंधावर
माझं प्रेम आहे

काळ्याकुट्ट ढगांवर
पावसाच्या पाण्यावर
पाण्याच्या थेंबावर
माझं प्रेम आहे

मळक्या पायवाटेवर
समुद्राच्या लाटेवर
शेतातल्या मोटेवर
माझं प्रेम आहे

मणसातल्या देवावर
देवातल्या माणसावर
साऱ्या देवमाणसांवर
माझं प्रेम आहे

जगातल्या साऱ्यांवर
साऱ्यांच्या जगावर
माझं प्रेम आहे
कारण.....
माझं माझ्या आयुश्यावर प्रेम आहे.
-अनिल बिहाणी.


Tuesday, March 11, 2008

प्रेम

तू नेहमीच धडपडायचा
तिला आपलेसं करण्यासाठी
तुला मदत करता करता
नकळत मीहि धडपडायची
तुला आपलेसं करण्यासठी

व्हायचं तुमचं लुटुपुटीचं भांडण
अन् मग तुमचं ते रुसणं फूगणं
मीच बनायचे मग मध्यस्थ
अन् द्यायचे तुमचे हात एकमेकांच्या हातात

जायचो आपण डोंगरदऱ्यात फिरायला
भटक भटक भटकायचो
अन् मग तुम्हाला एकांतात सोडून
पापण्यातले अश्रू लपवत
खिळवायची मी नजर पुस्तकाच्या पानावर


तिचं ते माझ्या नावावर घराबाहेर पडणं
तुमचं ते फिरायला जाणं
माझं मग बागेतल्या कोपऱ्यात
शून्यात नजर लावून तुमची वाट पहाणं

कधीतरी वाटायचं
देत आहोत आपणच आपल्या प्रेमाची आहूती
पण दुसऱ्याच क्षणी उमगायचं
प्रेम् असतं फ़क़्त देण्यासाठी
धडपडूच नये ते आपलेसं करण्यासाठी .
-अनिल


सदीच्छा

कधीतरी येतात आयुश्यात असे काही क्षण
अन् लोटला जातो मी खोल गर्तेत
अगदी तमाच्या तळाशी
शोधू लागतो स्वःताच स्वःताचे अस्तीत्व
अन् अडखळूनही पडतो काहीवेळा
बराचवेळ शोधल्यानंतरही अंधारामुळे
काहीच हाती लागत नाही
अन् कंटाळून परतावे म्हटले तरी
परतीचा मार्ग दिसत नाही.
अश्यावेळी अचानक चमकातात
तुमच्या सदीच्छांचे काजवेआणि
उजळून टाकीत सारा आसमंत
गवसून देतात माझ्यतले मीपण
अन् दाखवतातही परतीचा मार्ग
पुन्हा नव्या उमेदीने जगण्यासाठी
.-अनिल बिहाणी


Saturday, March 8, 2008

आठवण

येइल का गं तुला माझी आठवण ?
मी दूर गेल्यानंतर
होइल का गं पापणी ओली?
जुनं सारं आठवल्यानंतर
भासेल का एखादी संध्याकाळ
उदास एकाकी नकोशी?
अन् पाहून त्या वेड्या चन्द्रास
आठवेल का रात्र जागवलेली?
विचारलं मी काहीसं हळवं होत
अन् धरला
तुझा हात अफ़्गदी घटट्
तू टाकलास एक शांत कटाक्ष
आणि वार्यावरती गंध पसरावा
इतक्या हळूवारपणे बोललीस
"वेड्या, आठवण येण्यासाठी विसरावं लागतं."
-अनिल .

Friday, March 7, 2008

प्रेत

दुःख जे दाटले उरी, थडगे त्यावरी बांधियले
आणित हासू ओठांवरी, माझेच प्रेत मी मिरवीले

उघडनारे मनात सारे, दरवाजे बंद केले
चिरडुन टाकीत भावनांना, ताजमहाल मी उभारले

लपवीत लक्तरे मनाची, तलम रेशीम पांघरले
थिजवून टाकीत ह्र्दय हळवे, नेत्रास बांध घातले

दाखवीत आमिष सुखाचे, मनास मी समजावले
भूतकाळास विसरन्याचे, चोरुन आश्वासन घेतले

क्रुरतेने घाबरून माझ्या, मन वेडे हे गारठले
भडभडनाऱ्या चितेवरती मग, त्यास शेकुन आणले.
-अनिल .
-

Thursday, March 6, 2008

आयुष्य

नुकतीच कुठे आयुश्याची सुरुवात होती
पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती

सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले
मनाच्या गाभाऱ्यात मात्र आवसेची रात होती

समजुन फूले ज्यांना मी होते केसात माळले
उमगले मज नंतर काट्याची ती जात होती

आयुश्याची लक्तरे अन जीवनाची झालेली दशा
खडतर या वाटेवरती फ़क़्त दुःखाचीच साथ होती

आयुश्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले
मिणमिणनाऱ्या या दिपामधली सम्पलेली वात होती .
-अनिल बिहाणी.

आशा

पूर्व क्षितीजावरी पसरली लाली
उगवला सूर्य धरा जागी झाली

कोवळ्या किरणांसवे पक्षीही जागले
खळगी भरण्या पोटाची चहूदिशी विखूरले

हळुहळू मित्र पोहचला मध्यावरी
तापलेली धरा थोडि सुस्तावली

शेवटी एकदाची झाली संध्याकाळ
थकलेला रवी पोहचला नभापार्

उतरत अलगद क्षितीजाच्या खाली
देउन गेला आशा उद्याच्या उषेची
-अनिल

वेडी माया

निळं गाठोडं आभाळाचं
घेउन रे डोइवर
फिरते मी रानोरानी
शोधते तुज पानोपानी.


उधाण वाऱ्याला पुसते
कुठे गेला माझा सखा
नितळ तळ्यात धूंडते
चेहरा तुझा जीवलगा

शूभ्र कापसाच्या ढगा
वाट तुझी विचारते
काट्याकुट्याची वाट ही
फूलावानी तुडविते

जसा सुवास फूलात
तसा जीव माझा तुझ्यात
वेड्या प्रेयसीची ही
वेडी माया रे

नको नको रे राजसा
असा छळू मजला तू
वाळीवावानी बरसत
एकदातरी ये ना तू.
--अनिल बिहाणी.