Friday, March 21, 2008

बरसावं तर .............

बरसावं तर श्रावणासारखं
अगदी हळूवार
बरसतानाही ढगाआडून
धरावी मायेची उबार

बरसता बरसता अचानक
कधी बसावे लपून
ढगाआडून डोकवावं बनून
सोनसळी उन.

मोग-याजवळ रहावं साचून
छानसं तळं बनून
झूळझुळ करीत जावे कधी
झ-यासंगे वाहून .

बरसावं तर अगदी असंच
जावी स्रूष्टी मोहरून
बरसण्यानेही आपुल्या जावे
सा-यांचे चित्त सुखावून .

कधीतरी जावे मग
नकळत निघून
गेल्यानंतरही ह्रदयात कुणाच्या
असावे हिरवळ बनून .
-अनिल बिहाणी.

1 comment:

Vidya Bhutkar said...

Chaan :-) Khupach chaan aahe kavita. Avadali.
-Vidya