Saturday, February 2, 2013

वादळ...!गाडलेल्या मनाच्या तळघरात
आजही घोंघावतात
निद्रिस्त स्वप्नांची
वेडी वादळं.

उसळतात , रोरावतात
उद्ध्वस्त करीत सारं
होतात शांत
... आपसूकच कधीतरी

पण तरीसुद्धा ,

मनाच्या थडग्यावरील
अस्तित्वाची माती
मी कणभर देखील हलू देत नाही
निर्ढावलेपणाने ! नि:संशय !

-अनिल बिहाणी

No comments: