एक वठलेला व्रुक्ष उभा
देत आधार वेलाला त्या
नाही शक्ती तरिही कसाबसा
तग त्याने धरलेला.
तोच शक्ती वेलाची त्या
तोच त्याची भक्ती
तोच त्याची प्रेरणा अन्
तोच त्याचे अस्तित्वही.
कसली ही वेडी माया ?
खरेच मजला ठाउक नाही
आहे ठाउक एकच मजला
म्हणतो मी त्यास आई.
-अनिल बिहाणी.
No comments:
Post a Comment