Wednesday, June 17, 2009

सांजवेळी

कुणी सांजवेळी
नदीच्या किनारी
शोधीत कुणा
कुणाला पुकारी

कुणी मना-मनांच्या
बांधीत गाठी
प्राशीतो अमृत
लावीत ओठी


कुणी शब्दाना
घेती कवेत
जगण्यास नवे
संदर्भ देत
-अनिल बिहाणी.

Saturday, June 6, 2009

एक अप्रिय कविता

हल्ली मी बोजड कवितांचे ओझे
डोक्यावर घेउन फिरतो
अं~ ह असं मी नाही
लोक म्हणतात
ते असेही म्हणतात
तू गेल्यानंतर हे सारं सुरु झालं
मुर्ख आहेत ते
त्यांना काय माहित
तू असताना मी हे सारं
तुझ्याशी बोलायचो
आणि आता तू नसताना कवितेशी

-अनिल बिहाणी

तटस्थ

उडू द्यावी पडू द्यावी
एक नाव बुडू द्यावी
बुडनार्या नावेमधाली
एक हाक सडू द्यावी

खुलू द्यावी फुलू द्यावी
एक कली उमलू द्यावी
उमललेल्या फुलासवे
एक कळ सलू द्यावी

हिल द्यावी ढील द्यावी
थोडीशी पीळ द्यावी
ढील आणि पीळ मधली
आपण फक्त रीळ व्हावी

-अनिल बिहाणी

मी शोधात सुखाच्या आहे?

दुखास फूटते वाचा
मी एकटा असतो जेव्हा
मग दुःख बोलते फक्त
माझी अडते जीव्हा

दुखास कोणते शब्द
दुखास कोणती भाषा
दुःख जाणते फक्त
गालांवरच्या रेषा

तरीही पुन्हा का मी
भाळतो एकांतास ?
मी शोधात सुखाच्या आहे
हा बहाना केवळ ख़ास

-अनिल बिहाणी।

Friday, May 22, 2009

ज्ञानेश्वर

सुख कुणाचे दुःख कुणाचे
राग कुणाचा लोभ कुणाचा
हे तर सारे आपुले माझे
मी कुणाचा ?मी कुणाचा?

मागतो मी पसायदान जे
माझ्यासाठी कधीच नव्हते
हे तर सारे तुमचे तुम्हा
मी कुणाचा? मी कुणाचा ?

अभंग अजुनही गाते मुक्ता
दार कशास उघडावे मी ?
आसवास हे पाणी म्हणती
मी कुणाचा ?मी कुणाचा?


-अनिल बिहाणी .






भेसुरता?

मनाच्या नाजुक अंगावर
थयथय नाचून गेलेल्या
काळच्या जखमा आजही
अगदी तशाच ओल्या
उठते आजही एखादी
जीवघेणी कळ
तिच्यावर पडलेल्या एखाद्या
खारट खारट शब्दाने
अधुनमधुन उठनार्या या वेदनेवर
कणभरही समजुतींची हळद पडू नये
हा योगायोग की
अशाच वेदनांनी पछाड़लेल्या
समाज मनाची भेसुरता?


-अनिल बिहाणी.

Monday, April 6, 2009

नकळत

चुकते आहे काहीतरी
असे आतून वाटतानाही
मी शांतच राहीलो
माडर्न आर्ट असे काहीसे पुटपुटत
आणि देत राहीलो दाद
:
:
:
:

नकळत
-अनिल

when


when u ll be alone

।and u ll think abt ur past

what u have got

what u have lost

may u ll get answer

but it ll not be true

it ll only

your angle of view।

-anil bihani

अलगद असे............

अलगद असे भरून यावे
शब्दानी मग विरून जावे
सांज कापर्या क्षितीजानेही
कातर हलवे गाणे गावे

बंध रेशमी आठवताना
बांध नकळत फुटून जावे
पाउस असा पडून जाता
मेघांनी मग निघून जावे ।
-अनिल बिहाणी